इस्लाम आणि महात्मा गांधी
मुस्लिम धर्ममार्तंडांवरदेखील गांधीजींनी कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदू धर्मात मूर्तिपूजा जेव्हा एखाद्या दिव्य ध्येयाचे साधन बनते, तेव्हा ती इष्ट मानली जाते. जेव्हा मूर्तीच खुद्द दिव्य ध्येयस्वरूप बनते, तेव्हा ती जडपूजा होते, ती पापमय आहे. मी मूर्तीपूजेचा समर्थकही आहे आणि विरोधकही आहे. मूर्तीपूजेमुळे जे भ्रम निर्माण होतात, त्यांचे खंडन किंवा त्यांना विरोध करणे आवश्यक आहे.......